Friday, 7 December 2012

हॉट पेन्सिल स्कर्ट


हॉट पेन्सिल स्कर्ट

सेक्रेटरी स्टाइल म्हणून लोकप्रिय झालेल्या पेन्सिल स्कर्टमध्ये सध्या प्रिंटेड , लाइनिंग , फ्लॉवरी असे विविध प्रकार आले आहेत . स्कर्टच्या कापड , रंग आणि पॅटर्नमधील वैविध्यही आकर्षक आहे .

पेन्सिल स्कर्ट म्हटलं , की ऑफिसचे किंवा फॉर्मल ड्रेसेस असं सर्वसाधारण समज असतो . भारदस्त वाटणारे , उंची ‌ दिसणारे आणि कोणत्याही निमित्ताने पटकन वापरता येण्यासारख्या या स्कर्टमध्ये सध्या विविध स्टाइल्स आल्यायत . या स्कर्टच्या फॅशनबरोबरच त्यातील रंगवैविध्यही डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे . प्लेन राखाडी रंगाच्या स्कर्टवर गुलाबी किंवा गडद जांभळा टॉप चांगला दिसेल .

प्रिंटेड स्कर्टवर कॅपची फॅशनही ट्राय करायला हरकत नाही . त्यावर लाइनिंगचा टॉप किंवा टी - शर्ट अधिक खुलून दिसेल . मात्र , त्याबरोबर स्कर्टच्या रंगाशी जुळेल , अशी हातात छोटीशी पर्स घ्यायला विसरू नका . हे कॉम्बिनेशन जास्त भारी दिसेल .

गडद प्लेन हिरव्या रंगाच्या स्कर्टवर तुम्ही पांढरा फ्लॉवरी टॉप आणि पांढरे पेन्सिल सँडल ट्राय करू शकता .

स्कर्टचा पिवळा किंवा गुलाबी रंग तुम्हाला क्यूट लूक देईल . मात्र , हे स्कर्ट लाइनिंगचे असू द्या . म्हणजे त्यावर प्रिंटेड टॉप जास्त खुलून दिसेल .

गुडघ्याच्या बाजूला कट असलेला आणि पूर्ण गोल आकाराचा काळ्या रंगाचा डिझायनर स्कर्टही कोणत्याही टॉपवर खुलून दिसेल . काळा रंग हा तसा अत्यंत कॉमन रंग . त्यामुळे बटण किंवा चेनची काहीतरी हट के फॅशन असलेलाच काळ्या रंगाचा स्कर्ट निवडा .

प्लेन , अंगाला फिट बसणाऱ्या पेन्सिल स्कर्टची जादू खऱ्या अर्थानं दाखवायची असेल , तर त्यावर लूज स्वेटरला पर्याय नाही . चेक्स आणि वूलन कॉम्बिनेशन असलेल्या स्कर्टवर नी - लेंथचं जॅकेट तुमचं सौंदर्य हमखास खुलवेल .

पेन्सिल स्कर्टबरोबर चपलांची फॅशनही बदलता येईल . कधी हाफ - लेग शूज , कधी पेन्सिल हिल्स , तर कधी गम बूट यांसारख्या शूजची फॅशन नी - लेंथ स्कर्टवर शोभून दिसेल .

 

No comments:

Post a Comment