Friday, 7 December 2012

स्लीव्हलेसला सुट्टी


स्लीव्हलेसला सुट्टी

थंडी चांगलीच जाणवायला लागलीय . त्यामुळे कॉलेजमध्ये स्लीव्हलेसला सुट्टी मिळालीय . त्यानिमित्ताने स्लीव्हजच्या वेगवेगळ्या फॅशन कॅम्पसमध्ये दिसू लागल्यात .

डिसेंबरची थंडी आता हवेत चांगलीच जाणवू लागलीय . दिवसभर तिचा मागमूस नसला तरी सकाळचा गारवा मात्र तिचं अस्तित्त्व चांगलंच जाणवून देतोय . त्यामुळेच अनेक कॉलेजांमध्ये एक निराळीच फॅशन दिसतेय . हात फुटतात , थंडी वाजते , त्वचा कोरडी होते अशा अनेक कारणांस्तव समस्त तरुणीवर्गाने स्लीव्हलेसला सुट्टी द्यायचं ठरवलंय . स्वेटर्स , हुड्स , जर्किन्स तर अनेकींनी बाहेर काढलीत . स्कार्फ तर आहेतच . पण मॉर्निंग कॉलेजवाल्यांचा एक मोठा प्रॉब्लेम होतो , सकाळी जाताना चांगलीच थंडी जाणवते . पण दुपारी घरी येताना मात्र ती जर्किन्स जड होऊन जीव नकोसा करतात . त्यामुळे मग मुलींनी स्लीव्हजच्या वेगवेगळ्या फॅशनना आपलंसं केलंय .

मेगा स्लीव्हज , बलून स्लीव्हज , एल्बो स्लीव्हज असे अनेक प्रकार पाहायला मिळतायत . त्यातले बलून स्टाइल फुल फॉर्मात आहे . खांद्यापासून कोपरापर्यंत घोळदार असणारी ही नवी स्टाइल पोरींना भारीच आवडतेय . एखाद्या साध्याशा टीशर्टला बलून स्लीव्हज असले की टीज एकदम ट्रेंडी वाटायला लागतात . त्याचबरोबर कोपरापर्यंतच्या स्लीव्हजचीही फॅशन सध्या जोरात आहे . एल्बो स्लीव्हज आणि बलून स्लीव्हजचं कॉम्बीनेशनही जोरात आहे . त्याचबरोबर खांदे झाकले जातील अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या शॉर्ट किंवा कॅप स्लीव्हजही मुली वापरताना दिसतायत . त्याशिवाय फुल स्लीव्हजनाही चांगलीच मागणी आहे .
बारीक मुलींसाठी खास अशा पफ स्लीव्हजची व्हरायटी सध्या उपलब्ध झालीय . शिवाय हातांना घट्ट असून कोपरापासून खाली एखाद्या बेलच्या आकाराप्रमाणे सैल बनलेला त्रिकोण म्हणजे बेल स्लीव्हजवाले टॉप्स .

आजकाल मार्केटमध्ये आलेली आणखीन एक नवीन फॅशन म्हणजे पेटल स्लीव्हजवाले हँकी टॉप्स . कोपरापासून पुढे हातापर्यंत एखाद्या फुलाच्या पाकळीप्रमाणे या स्लीव्हजचे दोन तुकडे मनगटाला येऊन जुळतात . तसंच सुटसुटीत अशा मेगा स्लीव्हजही पॉप्युलर आहेतच .
त्याचबरोबर बिशप स्लीव्हजचा ट्रेंडही सध्या चांगलाच फॉर्मात आहे . यात कोपरापर्यंतचे हात सरळ असून त्यापुढे त्याला फुग्याचा आकार देण्यात आलेला असतो . त्या उलट डोलमन प्रकारात गळा पसरट असून काफ्तानप्रमाणे कोपरापर्यंतचे मोठे ढगळ हात आणि त्यालाच कमरेला घट्ट असं इलॅस्टिक असतं .
या सगळ्या स्लीव्हजच्या प्रकाराबरोबरच या थंडीत उबदार वाटावं म्हणून काही डार्क कलर्स फॉर्मात आहेत . त्यामुळे हॉट पिंक , पोपटी , पर्पल अशा रंगाची उधळण दिसतेय 

No comments:

Post a Comment