Friday, 7 December 2012
नखांचा नखरा
नखांवर केलं जाणारं नक्षीकाम सध्या कॅम्पसमध्ये जोरात दिसतंय . थ्रीडी आर्ट आणि निऑन कलर्समुळे नखांचा नखरा चांगलाच वाढलाय .
दिवाळीनंतर कॉलेज पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालीत . फेस्टिवल्सचा मोसम सुरु झालाय त्यातच लग्नसराईचीही धूम आहे . त्यामुळे बारावी , टीवायसारखे दुर्दैवी जीव सोडले तर बाकी सगळेजण फुल्ल ऑन दंगा मूडमध्ये आहेत . मग अशावेळी वेगवेगळ्या फॅशन न उगवत्या तरच नवल . तर मुद्दा असा की कॅम्पसमध्ये नखांवर नक्षीकाम करणारे कारागिर वाढलेत . बाजारातही नेलआर्टची अनेक डिझाइन्स मिळतात . त्यामुळे तर हे काम खूपच सोप्पं झालंय . नखांवर फुलांची नक्षी किंवा स्वतःच्या नावाची डिझाइन्स काढणं खूप ' इन थिंग ' आहे . थ्री डी सिनेमांची तर तरुणाईला क्रेझ आहेच . पण थ्रीडी नेलआर्टचीही तितकीच क्रेझ दिसतेय . फक्त एकच की ते प्रोफेशनल माणसाकडून करुन घ्यावे लागतात . त्याबरोबरट फुल , कार्टून्स , एखाद्या देशाचा झेंडा असे वेगवेगळे बिटस् मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे . ते आयते चिकटवले की तुमची नेलआर्ट तैय्यार .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment