फॅशनवीकवर मराठी ठसा
आशियातला सगळ्यात बडा फॅशन शो समजल्या जाणाऱ्या ' इंड ियन रिसॉर्ट फॅशन वीक ' मध्ये ठसा उमटवला तो १४ मराठी मुला - मुलींनी . त्यांच्या अफलातून डिझाइन्स आणि कलेक्शन्सची खूप वाहवा झाली . शिवाय त्यांना तिथे आपल्या कलेक्शनचं ट्रेडिंग करण्याची संधीही मिळाली .
हा फॅशन वीक गोव्यात नुकताच पार पडला . अनेक बडे डिझायनर्स आणि मॉडेल्सची उपस्थिती यामुळे फॅशन इंडस्ट्रीतलं हे एक बडं प्रस्थंच मानलं जात जातं . त्यामुळे इथे परफॉर्म करण्याची संधी दुर्मिळ असते . मुंबईच्या रचना संसद या कॉलेजच्या एकूण २९ मुलांनी या फॅशन वीकमध्ये त्यांचं कलेक्शन सादर केलं . त्यामध्ये स्वाती बागल , अनुजा दरेकर , स्वाती घाडगे , शीतल जाधव , पूजा पावसकर , हेमलता नाइक , एकता राऊत , प्रियांका शिवले , हर्षल वरळीकर , श्रद्धा जामसंडेकर , प्रार्थना मोहिते , प्रतिमा काणेकर , प्रांजली वायंगणकर , राहुल नारकर अशा एकूण १४ मराठी मुलं - मुलींचा समावेश होता .
पुढच्या वर्षी कोणती फॅशन उद्योगात कोणते रंग , फॅब्रीक इन असेल या विषयीचा ' फॅशन फोरकास्ट ' हा प्रोजेक्ट या मुलांनी इथे सादर केला . संपूर्ण फॅशनवीकमध्ये या फोरकास्टचीच चर्चा होती . त्याचबरोबर डाऊन टू डस्क , अफ्रिकन प्रिंट्स , ओशन डिस्टॉर्शन आणि टीपॉट अशा चार थीम्सवर आधारित ड्रेसेसचं कलेक्शन त्यांनी सादर केलं . शिवाय त्यांना प्रत्यक्ष ट्रेडिंग करण्याची संधीही मिळाली . त्यासाठी त्यांना तिथे स्टॉल मिळाला होता . ' आयआरएफडब्ल्यूमध्ये मिळालेली संधी मुलांसाठी मोठी होती . त्यांना मोठमोठ्या डिझायनर्ससमोर परफॉर्म करता आलं असं रचना संसदच्या प्रिन्सिपल अस्थाना यांनी सांगितलं .
No comments:
Post a Comment